अलिबाग, अमुलकुमार जैन
शिवकालीन मर्दानी खेळ हे आजच्या तरुणांनी अंगिकारले पाहिजे. शरीराची कसरत होणे आज खूप जरूरीचे आहे. अंगाला मेहनत अशी राहिली नाही. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आजच्या तरुणांनी शिवकालीन मर्दानी खेळाकडे वळून शरीराचा तंदुरुस्त पणा राखावा असे महत्वपूर्ण प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा सरचिणीस ॲड. महेश मोहिते अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील आर् सी एफ वसाहत मधील क्रीडा संकुल येथे लाठी असोसिएशन महाराष्ट्र आणि लाठी असोसिएशन अलिबाग रायगड व भाजप दक्षिण रायगड जिल्हा यांच्या विद्यमाने आयोजित 4थ्या राज्यस्तरीय लाठी अजिंक्य पद स्पर्धा अलिबाग 2023 स्पर्धेत केले.

ॲड. महेश मोहिते यांनी यावेळी उपस्थित खेळाडू यांना संबोधित करताना सांगितले की,शिवाजी यांच्या काळापासून या खेळाला महत्व आहे. महिला उपाध्यक्षा पल्लवी तुळपुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विभागाच्या पुढाकाराने लाठी काठी मर्दानी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे ही बाब भूषणवाह आहे.एक प्राचीन मर्दानी , छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा मोहक खेळ. एक व्यायामसाधना. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्त्व आहे. प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते; तथापि दुरून हल्ला चढविण्याच्या कामी लाठीच उपयोगी पडते.या युद्धकलेचे स्वरूप प्रात्यक्षिकात्मक असेच अद्याप आहे. नव्वदच्या दशकांपर्यंत या कलेच्या स्पर्धा होत होत्या. त्यापूर्वी केवळ फरी गदका प्रकारात दोघा प्रतिस्पर्ध्यांत लढत व्हायची. त्याला नियमांची चौकट होती. आता पुन्हा नव्याने युद्धकलेतील प्रकारांना नियमांच्या चौकटीत बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वीरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, चापल्य व कौशल्य वाढवणे यांसाठी लाठीचा उपयोग होतो.कुस्तीला पूरक व्यायाम म्हणूनही लाठीला महत्व आहे. भारतीय बलोपासनेत लाठीला उच्च स्थान आहे. जड लाठी, वजनदार लाठी, लांब लाठी (लठ), कवायत असे लाठीच्या व्यायामाचे प्रकार होतात. आपल्याकडेही व्यायामशाळांतून लाठी कवायती शिकवल्या जातात. प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठी ‘लाठी-लढत’ हा प्रकार महत्वाचा आहे. लाठी-लढंत व लाठी-बंदेश यांचा प्रत्यक्षत: उपयोग होतो; तर सांघिक लाठीचा केवळ प्रात्याक्षिक म्हणून उपयोग होतो.नियमांची बांधणी झाल्यास शालेय स्तरावर शिवकालीन युद्धकलेतील काही प्रकारांचा समावेश खेळ म्हणून करता येईल. ज्याद्वारे महाराष्ट्रातील या कलेला आपोआप प्रोत्साहन मिळणार असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी प्रतोद मानसी दळवी, पल्लवी तुळपुळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर प्रास्तविक प्रथम सुतार यांनी केले. व्यापीठावर कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, ॲड. निता तुळपुळे, अशोक वारगे, उदय काठे, सतीश लेले, जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता पिलनकर यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते