सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम भाजपने केले-अनंत गीते

अलिबाग, अमूलकुमार जैन

देशातील सुसंस्कृत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. महाराष्ट्र ही थोर संत यांची भूमी आहे. या सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम भाजपने केले असल्याचे प्रतीपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृह येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात केले.

कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,शिवसेनेत गद्दारी ही 20 जून 2022 रोजी झाली होती.खारघर येथे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र जमले असल्याची बातमी वाशी पुलावर समजली. तदनंतर ताबडतोब बबन पाटील यांना फोन लावला तदनंतर मी तिथे गेलो तेव्हा शिवसैनिक अंचबित झाली कारण मला तिथे बोलवले नाही. त्यावेळी खासदार बारणे देखील उपस्थित होते. त्यावेळी गद्दारी विरोधात पहिले रणशिंग फुलकले अंनत गीते यांनी खारघर येथे पुकारले. तदनंतर दुसरा मेळावा हा25 जून रोजी अलिबाग येथे घेतला गेला खरा अभिमान आहे तो शिवसैनिक असल्याचा. पदे ही कार्यकर्त्यांनी दिलेला सन्मान आहे. त्याचा अपमान होईल असे कृत्य कदापि होणे नाही. पदाची साखळी ही शिवसेना शिवाय कुठल्याही पक्षात नाही. शिवसेनेच्या साखळी पदातील एकही दुवा रिक्त ठेवता कामा नाही . पक्ष हा आदेशावर चालतो. मनानी चालत नाही. काही पदाधिकारी निष्क्रिय असतील त्यांनी ती पदे स्वतः हुन सोडावे. शंकर गुरव हा मागच्या रांगेत बसला होता. त्याला जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी बोलवले मात्र आला नाही त्यावेळी मी त्यास म्हणालो की, मागच्या मागे पळून जायचा विचार आहे असा सवाल केला असता तो ताबडतोब मागच्या रांगेतून पुढे येवून बसला.लोकसभा ह्या निवडणुका होणार आहेत. पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यामधे भाजप पराभूत होवून काँग्रेस येणार आहे. ज्या राज्यात निवडणूक झाली साडेचार कोटी मते भाजपला मिळाले तर काँग्रेसला सात कोटी मते मिळालेली आहेत.आनंदाला हुरहूर्न जाणारा निकाल नाही 24च्या निवडणूकीत भाजप 250 च्या पुढे जाणार नाही इंडिया आघाडीला सत्तेत येण्याची आशा आहे. यापुढे येणाऱ्या निवडणुका हया इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत. राज्यात आघाडीचे 25 हुन खासदार निवडून आले तर केंद्रात मानाचे पान शिव सैनिक यांना मिळणार आहे आपल्यात ताकद आहे ही ताकद आपल्याला माहिती पाहिजे. कार्यकर्त्याला ठामपणे उभा करायचा असेल तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. या पाच राज्यातील निवडणुकीचा बोध काँग्रेसला घ्यावे लागणार आहे. हा मुद्दा काँगेस साठी नाहीतर आपल्यासाठी आहे. काल पर्यंत काय झाले ते विसरून नव्याने सुरवात करायची आहे ती सुद्धा उद्यापासून. प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच. स्थानिक वाद मिटवून आघाडी म्हणून आपणास एकत्र येणे गरजेचे आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी वर्षा बांगला सोडला तेव्हा अख्खा महाराष्ट्र डोळ्यात अश्रू आले होते. स्वतःच्या फायद्यासाठी संघटनेला दावणीला बांधून चालणार नाही.आपले रुसवे फुगवे सोडून आपले कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. देशातील सुसंस्कृत राज्य म्हणून महाराष्ट्राची होती मात्र ही ओलख पुसण्याचे काम भाजपने केली आहे. सत्तेसाठी भाजपने आपल्या महाराष्ट्राची वाईट अवस्था केली आहे.लोकसभा निवडणुक पुढे ढकलण्याची तरतूद नाहीं म्हणून निवडणुका होती. भाजप सारखे नीच राजकारण काँग्रेस ने सुद्धा कधी केले नाही. आपल्याला आता एक व्हावे लागेल. आपण एक झालो तर भाजप हा नेस्ताबानुत होणार आहे. केंद्रात पुन्हा एकदा इंडिया आघाडी येणार आहे तर महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकार येणार आहे.

जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची नियुक्ती झाल्यानंतर ताबडतोब रायगड जिल्ह्यात मेळावा घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार यानी गद्दारी केली तेव्हा निष्ठावंत कार्यकर्ते गद्दार आमदार सोबत गेले नाही. इंडिया आघाडी मुळे यश चांगले प्राप्त झाले आहे. पैसे न देताही आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आले. गीते यांच्या बाबत नागरिकाच्या मनात आदर आहे. आघाडीची सभा ही जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे. दहा वर्षापूर्वीची शिवसेना ही आजची खरी शिवसेना आहे दहा वर्षात आले ते निघून गेले मात्र त्यांना नेसतनाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही. जेजे भ्रष्टाचारी होते ते भाजप मध्ये गेले ते पवित्र झाले. त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करणे गरजेचे आहे. गावगावात पक्ष वाढीसाठी बांधणी करणे गरजेचे आहे. आम्हीं तुमच्या बरोबर आहोत. उद्या येणारा दिवस आपला आहे. मुंबईत आघाडीची बैठक झाली त्याचे यजमान पद सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले होते. रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त मते देण्याचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. पक्षात एकाधिकार शाही चालणार नाही. असाही इशारा यावेळी दिला.देशाचे संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीबरोबर जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. येत्या जानेवारीत अलिबागमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत शेकापच्या मदतीने अनंत गीते यांना अलिबाग मतदारसंघातून दीड लाखांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page