तेल माफिया बंधू फरार, टँकर चालकाला अटक क्राइम ब्रँच पोलिसांच्या ताब्यात करोडोंचा माल.

अलिबाग, अमूलकुमार जैन

रेवदंडा पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूंडलिका खाडीच्या येथून डिझेल तस्करी

  आठ दिवसात नवी मुंबई पोलिसाची रायगड जिल्ह्यात दुसरी कारवाई

  रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उत्सव गार्डन हॉटेल समोर, गोवा-पनवेल रोडवर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध डिझेल तस्करी करीत असताना राजमनी पुरषौत्तम सरोज,( वय ३९ वर्षे, धंदा चालक, रा. रूम नं० ९३, गजानन चाळ, एम. एच. रोड, सायन, मुंबई. ३७. मुळ रा. ग्राम – दुधली, पो. गुलजारगंज, ठाणा सिकरारा, ता. जि. जोनपुर, उत्तरप्रदेश, ) याला करोडोंचा मालसहित ताब्यात घेतले असून रामनारायण सुबेदार सिंग,( प्लॉट नं. ४२२, शशि हिला, से.क. ०१, दर्गा जवळ, घनसोली, नवी मुंबई.) हृदयसिंग सुबेदार सिंग, ( प्लॉट नं. ४२२, शशि व्हिला, से.क. ०१, दर्गा जवळ, घनसोली, नवी मुंबई ) हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. याबाबतची फिर्याद नितीन नामदेव जगताप,(पोलिस हवालदार बक्कल नंबर ४४७, नेमणुक – मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांनी दिली आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की,गोवा-पनवेल रोडने १२ टायर टैंकर क. एम एच 43 सीई 1655 यामधुन अवैदयरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ येणार आहे. मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, ( नेम- मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई ) यांचे आदेशाने उत्सव हॉटेल समोर, गोवा-पनवेल रोडवर, ता. पनवेल जि. रायगड या ठिकाणी जावुन सापळा लावला असता १२ टायर टैंकर क. एम एच 43 सीई 1655 हा येताना दिसताच त्यास थांबवुन पोउपनि संजय रेड्डी यांनी सदर टँकर चालकाला पोलीस पथकाची ओळख करून देवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव राजमनी पुरषौत्तम सरोज, यांच्याकडे सदर वाहन चालकाकडे वाहन व त्यामध्ये असणा-या मालाबाबत विचारपुस केली असता, त्याने सदरचा टँकर हा सदरचा टँकर हा रामनारायण सुबेदार सिंग यांचे मालकीचा असुन त्यांचा भाउ हृदयसिंग सुबेदार सिंग यांचे सांगण्यावरून सदर टँकरमध्ये अलिबाग तालक्यातील रेवदंडा येथुन समुद्रातील बोटीतुन सुमारे २८००० लिटर डिझेल मोटारचे सहाय्याने त्याचे ताब्यातील टँकर क. पत्ताएम एच 43 सीई 1655 मध्ये भरले असल्याचे सांगुन मालक हृदयसिंग सुबेदार सिंग यांचे सांगण्यावरून सदरचा टँकर तो घेवुन येत होता, असे सांगितले. सदर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचे मालाबाबत त्यांचेकडे कागदपत्र मागितले असता, त्यांचेकडे कोणतेही वैध कागदपत्र तसेच ऑईल कंपनीचे अधिकृत इन्व्हाईस किंवा आयात केल्याचे बील, इंट्री अथवा कस्टम क्लिअरन्स किंवा इतर कुठलेही वैध इन्व्हाईस तसेच नमुद टँकरचे व त्यातील मालाचे त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले, यावरून सदर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ संशयास्पद रित्या व गैर उद्देशाने वाहतुक करीत असल्याचा संशय आल्याने सदर टँकर मधील डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ हा त्यांचेकडे वरील प्रमाणे मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने असण्याची शक्यता वाटल्याने सदर टैंकर कमांक एम एच 43 सीई 1655 मध्ये पोलिस हवालदार नितीन जगताप व टँकर चालक यांना बसवुन टँकर नमुद चालकाच्या मदतीने चौकशीसाठी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे आणण्यात आला. सदरचा टैंकर हा पाच कप्याचा असुन प्रत्येक कप्यास आतुन होल पाडलेले असुन तो आतुन सलग एकव असल्याचे चालक हा समक्ष सांगत आहेत. त्यामध्ये कप्पा क. १ ते ४ अ.क. ६००० लिटर क्षमतेचे असुन कप्पा क. ५ हा ५००० लिटर क्षमतेचा आढळुन आला, सदर कप्पामधील साठयाची अधिकाऱ्यांनी लोखंडी डिपॉडचे सहाय्याने मोजदाद केली असता त्यामध्ये सर्व एकत्रित पाच कप्यामध्ये २६,३२,०००/- रू. किंमतीचे एकुण २८,००० लिटर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा आढळुन आला आहे. या प्रकरणी राजमनी पुरषौत्तम सरोज, यास अटक केली असून रामनारायण सुबेदार सिंग आणि त्यांचा भाउ हृदयसिंग सुबेदार सिंग हे दोघेजण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
  याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई ६७९/२०२३, भादवि कलम २८५,३४ तसेच जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३.७,८ व १० व मोटार स्पिरीट अॅण्ड हायस्पिड डिझेल (रेग्युलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशर अॅण्ड प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस) ऑर्डर २००५ चे कलम २ (ए) (पी) (क्यु) (आर) (एस) (टी), ३(४), ३ (५) तसेच पेट्रोलीयम अॅक्ट १९३४ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक संजय रेड्डी, मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा हे करीत आहेत.

  Please Share

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You cannot copy content of this page