अलिबाग, अमूलकुमार जैन
श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जुनी पेन्शन योजना व इतर १७ मागण्या करता सरकारी कर्मचारी यांनी बेमुदत संपास प्रारंभ केला आहे. श्रीवर्धन प्रांताधिकारी दीपा भोसले यांच्याकडे कर्मचारी समन्वय समितीने त्यांची निवेदन सादर केले . सदरच्या निवेदनामध्ये विविध मागण्या समाविष्ट करण्यात आल्या .
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने लागू करावी, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ सेवेत असल्यामुळे सर्वसामान्य किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा, आरोग्य विभागास अग्रक्रम देऊन रिक्त पदे तात्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती विनाश शर्थ करण्यात याव्यात , वाहतूक शैक्षणिक सर्व अनुषंगिक भत्ते केंद्र प्रमाणे मंजूर करावेत चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटावी , शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत निवृत्तीचे वय 60 करावे नवीन शिक्षण धोरण रद्द करावे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती सत्र तात्काळ सुरू करावे अशा विविध एकूण 18 मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला . कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे निश्चितच सर्वसामान्य व्यक्तींना अडचणीचा सामना करावा लागला . श्रीवर्धन तहसीलदार,नायब तहसीलदार एक दिवस रजा आंदोलनात सहभागी झाले . समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये विस्तार अधिकारी संघटना , महसूल , कृषी अशा विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
आमच्या संघटनेचे वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात आलेला आहे. शासनाने मागण्या मान्य कराव्यात …. सुदर्शन पालवे ( महसूल कर्मचारी श्रीवर्धन )
कर्मचारी समितीने दिलेले निवेदन शासन दरबारी पाठवले जाईल…… डॉ.दीपा भोसले ( प्रांताधिकारी श्रीवर्धन )