महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना आयोजित १३ वी सागरी जलतरण स्पर्धा नुकताच संपन्न झाली या स्पर्धेमध्ये उरणच्या स्पर्धाकांनी उत्तम कामगिरी बाजावली. तर या स्पर्धेमध्ये जेष्ठ नागरिकांनी घेतलेला सहभाग या स्पर्धेचा आकर्षणाचा भाग होता.
कोकणातील मालवाणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावर समुद्रीय जलतरण संपर्धांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा १३ वी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. तर या स्पर्धेमध्ये राज्यातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी उरण नगर परिषदेच्या तरण तालाव येथे सरावं करणाऱ्या जलतरण पटुंनी सहभाग घेत उत्तम कामगिरी केली आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेत किशोर पटिल. ४६ वर्षा वरील गट ३ किमी 2 रा क्रमांक, जगदीश पटिल. ३६ वर्षा वरील गट ३ किमी ७ वा क्रमांक, नितिन जाधव. ३६ वर्षा वरील गट ३ किमी ९ वा क्रमांक, आर्य पटिल १२. वर्षा खलील गट २ किमी ७ वा क्रमांक, रुद्राक्षी टेमकर. १५ वर्षा खलील गट१० किमी ४ था क्रमांक, मयंक म्हात्रे. १५ वर्षा खलील गट १० किमी पूर्ण, विनायक पटिल. ४६ वर्षा वरील गट ३किमि पूर्ण, सुरेंद्र वैवड़े. ५६ वर्षा वरील गट २ किमी पूर्ण करून उरणच्या नावाचा दबदबा कायम ठेवला आहे. तर नववर्षात होणाऱ्या “विजयदुर्ग ओपन सी वॉटर कॉम्पिटिशन” मध्ये देखील सहभाग घेऊन उरणचे स्पर्धक आपली चमकदार कामगिरी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.