रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा आणखी एक विक्रम

उरण, विरेश मोडखरकर

रायगडची १३ वर्षीय जलकन्या रुद्राक्षी टेमकर हिने ‘धरमतर जेट्टी’ ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे ३६ कि.मी. अंतर पोहून पार करत, आपल्या विक्रमांच्या यादिमध्ये आणखी एका विक्रमची नोंद केली आहे. यामुळे तिचे जिल्हाभरातून कौतुक केलेजात आहे. तर तिच्या चाहात्यांनी तिला भरभरून शुभेचही दिल्या आहेत.

   उरणमधील आर. के. एफ. जावाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर या विद्यार्थिनीने आणखी एक विक्रम केला आहे. यापूर्वी तिने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया २४ कि.मी., धरमतर ते मांडवा जेट्टी २६ कि. मी. आणि घारापुरी ते गेट वे ऑफ इंडिया १६ कि. मी. हे तीन चॅनल पोहून पार केल्याने तिला रायगडची जलकन्या म्हणून ओळखले जाते. या रायगडच्या जालकन्येने केलेल्या विक्रमांची नोंद आधीच 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' ने घेतली आहे. तर तिने केलेल्या चौथ्या विक्रममुळे चर्चेत आली आहे. रुद्राक्षीने धरमतर जेट्टी येथून रात्रीच्या काळोखामध्ये समुद्राच्या पाण्यावर झेप घेत आपल्या विक्रमाला सुरुवात केली. यावेळी एका बाजूला इसपात कंपनीच्या पोर्टची वर्दळ आणि दुसऱ्या बाजूला कोळसा आयात-निर्यातीची वर्दळ असताना, या मोठमोत्या जहाजांच्या वरदा्लीतून मार्गदर्शन काढत, एक एक हात आपल्या विक्रमकडे सरसावत असताना, भरती-ओहटीमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र प्रवाहाचा सामना रुद्राक्षीला करायचा होता. तर थंडीचा प्रभाव आणि खाडीमध्ये असणारी मासे पकडण्याची प्रचंड प्रमाणातील जाळी हे मोठे आव्हान देखील होते. या सर्वातून मार्ग मोकळा करत रुद्राक्षीने मुंबईचे ऐतिहासिक रत्न 'गेट वे ऑफ इंडिया'ला साक्ष ठेवत आपला विक्रम ८ तास ५९ मिनिटांचा वेळ घेत पूर्ण केला. तिच्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलातरण संघटनेने घेतली असून, संघटनेच्यावातीने आहेले निरीक्षक निलकंठ आखाडे यकानी रुद्राक्षीने विक्रम पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा 'गेट वे ऑफ इंडिया' येथे केली. 

वृद्राक्षीने केलेल्या विक्रमांबाबत बोलताना तिच्या कर्तृत्वाचे सर्व श्रेय तिने आपले आई, वडील आणि प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर मार्गदर्शक किशोर पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार देखील मानलेली आहेत. आपल्याकडे मेहनत करण्यासाठी ताकद, एकाग्रता, जिद्ध आणि परिस्थितीची जाणीव असेल तर आपण अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय प्राप्त नक्कीच करूशकतो असेही तिने बोलताना म्हटले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page