शाहिर वैभव घरत यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

उरण, विरेश मोडखरकर

आदर्श समाजसेवक, आदर्श ग्रामसेवक ते यशस्वी लोक शाहिर असा प्रवास करणाऱ्या उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वैभव धनाजी घरत यांना नुकताच कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार – २०२४ हा जाहिर झाल्याने लोक शाहिर वैभव घरत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

श्री केळंबादेवी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खरोशी या पेण तालुक्यातील गावातील धनाजी घरत या शेतकरी कुटुंबात वैभव घरत यांचा जन्म झाला.त्याना लहान पणापासून अभ्यासाबरोबरच गायनाची आवड होती.वैभव घरत यांनी आपले आई वडील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेत हिरीरीने सहभाग घेतला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा असल्याने खेडोपाड्यात, शहरी भागात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पवाडे सादर केले.त्यामुळे जनमाणसाने वैभव घरत यांना लोक शाहिर ही पदवी बहाल केली.एक आदर्श समाजसेवक ,ग्रामसेवक ते लोक शाहिर असा प्रवास करणाऱ्या वैभव घरत यांना अनेक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page