उरण, विरेश मोडखरकर
नुक्ताच वाशी,नवी मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये उरणच्या स्वरंगी जाधव हिने' मिस टीन नवी मुंबई २०२४'तसेच'गॉडेस ऑफ एलिगन्स' हे दोन टायटल मिळवत उरण तालुक्याच्या सौंदर्यात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता १२ वी मध्ये शिकणाऱ्या स्वरंगीला नृत्य आणि गायनाचा छंद असून, सौंदर्य स्पर्धेत तिने देखील तिने आपली जागा आता निश्चित केली आहे.
उरण शहरामधील विनायक या गावातील एका सामान्य घरामधील स्वरांगी गणेश जाधव हिने स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्याचे नाव मुंबई, नवीमुंबईमध्ये उंचावले आहे. डॉक्टर स्मायली पॉल यांच्या संकल्पनेतून ‘क्लासिक फॅशन फिरएसस्टा’ या सौंदर्य स्पर्धेचे वाशी येथील एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये २०० स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. जवळपास एक महिना सुरु असलेल्या या स्पर्धा प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या फेऱ्या घेण्यात आल्या. या फेऱ्यांमधून स्वरांगीने पहिल्या १० स्पर्धाकांमध्ये आपले स्थान कायम करत अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. यानंतर ‘वाशी एक्जीबिशन सेंटर’ येथे २१ जानेवारी २०२४ रोजी पार पडलेल्या ‘क्लासिक फॅशन फिएसस्टा ‘ या स्पर्धेतील सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत ही स्पर्धा तिने जिंकली आहे. यावेळी तिला ‘मिस टीन नवी मुंबई २०२४’ तसेच ‘गॉडेस ऑफ एलिगन्स’ हे दोन टायटल प्रदान करण्यात आले. स्वरांगीने स्पर्धेतील चमक दाखवत उपस्थितांना सौंदर्याची भुरळ घालत आपल्या उरण तालुक्याचे नाव मुंबई आणि नवीमुंबई सारख्या शहरामध्ये उंचावले आहे. तर तिच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वरांगी सध्या उरणमधील यु.ई.एस. कॉलेजमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत असून, अभ्यासातही उत्तम आहे. तर तिच्या या यशामुळे कॉलेजमध्ये देखील सन्मान मिळत आहे.