कर्जत, गणेश पुरवंत
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेला कशेळे गावातील,तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायती वर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात २०० हून अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या होत्या.आठ दिवसातून एकदा पाणी येते तर आम्हाला रोजचे पाणी पाहिजे अशा प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेत महिलांचा गदारोळ चालू होता.पण त्याच्या पदरात निराशा हाती आली.ग्रामसभेत कशेळे गावातील पाण्या विषय समस्यांचा प्रश्न उपस्थित केला पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामअधिकारी हात झटकत ठेकेदारांना कडे बोट दाखवत ग्रामसभा संपवत चहा देऊन महिलांचे तोंड गोड केले.
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडी वाडीतील महिला यांनी पाणी समस्या विषयी मोर्चा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेत मोर्चा आणला होता.या ग्रामसभेला कशेळे ग्रामपंचायत मधील एकही सदस्य उपस्थित नव्हते. ग्रामसभेला सरपंच, ग्रामअधिकरी, व कर्मचारी,यांच्या उपस्थितीत तसेच कशेळे गावातील महिला व आदिवासी वाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या.या महिलांना आठ दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नाही.या त्रासाने महिलांनी स्वःता ग्रामसभेला उपस्थित राहून पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला.पण त्यांना समाधान कारक उत्तर मिळाले नाही.महिलांच्या पदरी निराशा आली.
जूनी नळ पाणी योजना चालू आहे तीला दहा वर्ष झाले अध्याप परत ग्रामपंचायत यांच्या कडे हस्तारींत केली नाही त्यामुळे ग्रामसेवक,सरपंच हात झटकत ज्यानी काम घेतले आहे अशा ठेकेदारांना कडे बोट दाखवत हात वर करत ठेकेदार तुम्हाला पाणी देईल आमची जबाबदारी नाही असे सरपंच यांच्या कडून उत्तर देण्यात आले. आम्ही ठेकेदारांना सांगून लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणी नळाला येऊदे असे सांगू.महिलांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला इतर फार्महाऊस, कंपनीला पाणी दिले जाते ते पहिले बंद करा आम्ही जे काय बिल, घरपट्टी येईल किवा मेन्टेन्सचा खर्च होईल तो आम्ही दर घरटी देऊ असे जमलेल्या महिलांनी सांगितले.बाहेर पाणी देत असल्याने कशेळे गावात पाण्याची टंचाई भासत आहे.जी जूनी पाण्याची योजना आहे त्या योजनेच्या नळाला दोन दिवसा आड पाणी येत असते.आम्हाला रोजच पाणी पाहिजे असे महिलानी सांगितले. नविन नळ पाणी योजना आहे ती लवकर पूर्ण करून महिलांना पाणी त्यांच्या दारी मिळावी अशी मागणी महिलांन कडून केली जात आहे. कशेळे ग्रामपंचायतीसाठी ३.५ कोटी रुपयाची जल जीवन मिशन योजना मंजूर आहे.बहुतेक काम पूर्ण होत आले आहे.कशेळे येथील काही अडचणी मूळे पूर्ण झाले नाही ते सुद्धा काम मार्च महिन्यात पूर्ण करू असे ठेकेदार रुपेश हरपुडे यांनी सांगितले.
कशेळे गावात आठ दिवसांनी एकदा पाणी येते आमच्या गावात पाण्याची खुप टंचाई भासत आहे. पाणी आले तरी ते कधी पण येते पाणी सोडण्याचा टाईमिंग नाही आम्ही घरात असलो की भरतो नसलो तर आठ दिवस पाणी मिळत नाही.गावात नळ असून आम्हाला उपयोग काय आठ दिवसांनीं मिळत असेल तर आम्ही पाण्यासाठी कोणाकडे जायचे अशा अनेक महिलांची समस्या आहे.आम्हाला रोज पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांनीही काहीतरी उपाय योजना करावी……सुषमा मते. कशेळे ग्रामस्थ महिला.
कशेळे ग्रामपंचायतीसाठी ३.५ कोटीची रुपयाची जल जिवन मिशन योजना राबवली जात आहे.या योजनेचे काम पूर्ण करण्याची वर्कआऊट मे २०२४ पर्यंत आहे. यात बहुतेक गावांना पाईप लाईन टाकून झाली आहे. कशेळे येथील सुद्धा पाईप लाईन टाकून झाली आहे काही अडचणी मुळे काम हळूहळू चालू आहे. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पाईप फुटले आहेत त्यामुळे कशेळे गावात पाणी येत नाही ते सुद्धा लवकरच दुरुस्ती करून रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू मार्च २०२४ पर्यंत सर्व काम पूर्ण करु……ठेकेदार, रुपेश हरपुडे.