पुणे, प्रतिनिधी
उरणमधील प्रतिष्ठित डॉक्टर, पत्रकार आणि उद्योजकांनी व्हॅली कॉसिंगचा थरार अनुभवला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या जिवधन किल्ला येथून समोर दिसणाऱ्या वानरलिंगी सुळक्यापर्यंत झिपलाईन क्रॉसिंग करून, सुळक्यावरून तीनशे फूट खोल रॅप्लिंगीचा चित्त थरारक अनुभव घेतला आहे. या अनुभवानंतर प्रत्येकाला स्वतःला पारखण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्यवसाय अथवा पेशा कोणताही असो, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. कुणाला वाचन, गायन, खेळ, लिखाण, तर कुणाला इतिहासात डोकावण्याचा छंद असतो. अशा अनेक गीष्टींपैकी एक ना एक छंद प्रत्येकाला असतो. सध्या ट्रेकिंग, गड किल्ले फिरणे आणि त्यातून साहस अनुभवाने हे फार प्रचलित झाले आहे. ज्यांना साहसी खेळांचा अनुभव घ्यायचा आहे, ते अशा साहसी ट्रेकना जाण्याचा छंद बाळगतात. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील प्रसिध्द डॉक्टर, पत्रकार आणि उद्योगपती एकत्र येऊन "ट्रेकिंग बडीज" नावाने एक ग्रुप बनवून सहसी ट्रेक करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये राज्यातील कठीण हरिहर गड, कलावंतीण गड, गोरख गड, इर्शाल गड यासारखे अनेक गड या ग्रुपने सर केले आहेत. तर रविवारी पुणे येथील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या जिवधन किल्ला ट्रेक करून, किल्ल्यासमोर असणाऱ्या वानरलिंगी सुळक्यावर झिपलाई नकरत व्हॅलीक्रॉसिंग करून, सूळक्यावरून तीनशे मिटर रॅपलिंग करण्याचा थरारक अनुभव घेतला आहे. यावेळी जेष्ठ आणि प्रसिद्ध डॉ. सुरेश पाटील, डॉ. मनोज भद्रे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. अजय कोळी, नवराज्यचे संपादक पत्रकार विरेश मोडखरकर, उद्योजक नितेश ठाकूर, गणेश यांनी या साहसी खेळात सहभाग घेतला.
साहसी खेळ पहाणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात खूप अंतर आहे. प्रत्यक्ष साहसी खेळात सामील होऊन अनुभव घेणं महत्वाचं असतं. यासाठी वयाची आत नसावी. आपण अशाप्रकारचे साहस करून, स्वतःला अनुभवत असताना निरोगी आणि सुधारूढ राहण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे आपल्याला अधिकाधिक उत्तम जीवन जगण्याची संधी मिळत असते. असे मत यावेळी डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. सत्या ठाकरे यांच्यानुसार साहसी खेळ करताना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन असणे महत्वाचे आहे. स्वतः कोणतेही साहस, अनुभव नसताना करूनये. ज्यामुळे आपला जीव धोक्यात येशकतो. एखादा ट्रेक, झिपलाईन, रॅपलिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडींग, बंजी जम्पिंग असे खेळ आता देशामध्ये अनेक ठिकाणी खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक आहेत त्या ठिकाणी अशा खेळांचा अनुभव घेता येईल.
साहसी खेळ करत असताना, त्या खेळाचा थरार अनुभवत असताना, आपल्याला आपल्या स्वतःला पारखण्याची संधी मिळत असते. काही सेकंदात आपल्याला आपल्या जीवनाप्रती आदर आणि प्रेम अशा खेळांमधून निर्माण होते. योग्य ती खबरदारी आणि उत्तम मार्गदर्शक असल्यास असे अनुभव घेता येतात. जिवधन, वानरलिंगी हे झिपलाईन आणि रॅपलिंग करताना प्रचंड थरार अनुभवता आला असे मत नवराज्यचे संपादक विरेश मोडखरकर यांनी व्यक्त केले.
“ट्रेकर्स बडीज” या ग्रुपच्या बकेट लिस्टमधला जिवधन ट्रेक आणि वानरलिंगी झिपलाईन क्रॉसिंग रविवारी पूर्ण झाला. एस.एल.अडव्हेन्चर या अनुभवी संस्थेच्या माध्यमातून हे साहस करण्यात आले. महत्वाचे म्हणजे यावेळी उत्तम ट्रेकर आणि मार्गदर्शक एव्हरेस्टवीर लहू उघडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पद्धतीने हे साहस करण्याचा अनुभव यावेळी घेता आला. या अनुभवानंतर ग्रुपच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.