उरण, अजय शिवकर

लोकल ट्रेनमध्ये प्रसूती झालेल्या महिलेची केली होती मदत
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाचे आयुष्य गतिमान झाल आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा सर्वत्र कार्यरत आहेत. अशात महिलाच नाही तर पुरुषांना सुद्धा कितीतरी अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी अडचणींना सामोरे जाताना गरज असते ती खऱ्या माणुसकीची आणि ती दाखविणारा संकटाच्यावेळी देवच ठरतो.

तीच्या या कार्याची दखल घेवून कोकण युवा सेवा संस्थेचे उरण तालुका संघटक परेश म्हात्रे यांनी निकिता शेवेकर यांची माहिती घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभि कोटकर, सचिव तृशांत पवार, उपसचिव अनिल गावडे, व खजिनदार संजना बेंद्रे यांनी निकिता देवेंद्र शेवेकर यांच्या घरी जाऊन साडीचोळी, सन्मानपत्र देऊन सन्मान केला. यावेळी कोकण युवा सेवा संस्थेच्या स्वप्नाली पाटील, आरती फुलदाणी, राहुल कोशे, मनोज सोनकर, महेश कोळी, कुंदन फुलदाणी, ॲड. पुर्वी कोशे उपस्थित होते.