कर्जत, गणेश पुरवंत

रायगड जिल्हा परिषद शाळॆमध्ये स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा तसेच शिक्षणासह क्रीडा नृत्य संभाषण कौशल्य इत्यादी उपक्रम राबवले जातात मात्र कर्जत मधिल किरवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये आता नवीन उपक्रम म्हणून भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकेचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहार करिता यूपीआय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले.

किरवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियांका हरवंदे यांनी नवीन उपक्रम म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकेचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहार करिता यूपीआय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरामध्ये दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड शाखा कर्जत येथे संपर्क साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केल्या प्रमाणे दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड शाखा कर्जत वतीने कृष्णा सुतार सीनियर क्लार्क, सहाय्यक आदित्य कृष्णा जाधव हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिकां सौ प्रियांका हरवंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृष्णा सुतार यांनी आधुनिक कार्यप्रणाली कशी हाताळावी याचे फायदे व तोटे उत्तम प्रकारे समजून सांगितले उदा.पेटीएम ,फोन पे ,गुगल पे ,एटीएम कार्ड ,क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ,क्यूआर कोड चा वापर व ऑनलाईन कार्यप्रणाली तसेच सरकारी बँका, पतपेढी ,खासगी बँकांबद्दल, माहिती यांच्यातील गुंतवणूक व त्याबाबतीतील मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती. सांगितली लहान वयात विद्यार्थ्यांनी पैसे कसे साचवून (नियोजन) कराता येऊ शकते बँकेत अज्ञान पालन करता या नावे खाते काढून जमा करता येऊ शकतात खाऊला दिलेल्या उरलेल्या पैशांची बचत करून बँकेत कसे भरावे विविध प्रकारची चलने व चेक चे उदाहरण प्रत्यक्षात दिले. आधुनिक काळात होणाऱ्या फसवणुकी कॉल पासून आपला पिन कोड ओटीपी कोणालाही सांगू नये व त्यापासून होणाऱ्या नुकसानापासून कसे वाचावे याबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांनी देखील अनेक प्रश्न विचारले क्रेडिट व डेबिट कार्ड यातील फरक काय सांगताना क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम वापरू शकता व ठरवलेल्या कालावधीत बँकेत पैसे हप्त्यांनी भरावे लागतात व व्याज द्यावे लागते. डेबिट कार्ड बद्दल सांगताना डेबिट कार्ड मध्ये आपल्या खात्यात जेवढी शिल्लक रक्कम आहे तेवढी काढता येते. अशाप्रकारे बँकिंग व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांस दिली यावेळी शिक्षक वर्ग चित्रा किशोर पाटील, आकाराम पाटील,वैशाली रुपेश पाटील व बँकेचे इतर कर्मचारी स्वरूप मुळे ,मंगेश शिंदे,रवींद्र मिनमिने,नारायण बडेकर उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन राजेंद्र सोपान रुपनवर यांनी केले.
