उरण, प्रतिनिधी
सांस्कृतिक ऐक्याची माहिती होण्यासाठी रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे भारतीय सांस्कृतिक वारसा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, ओरिसा,पश्चिम बंगाल,गुजरात, दक्षिण भारत, पंजाब या राज्यातील लोकांचे पोशाख ( वेशभूषा ), खाद्यपदार्थ, त्यांचे लोकनृत्य या सर्वांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाला पसंती दाखवली.
सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक कौशिक ठाकूर, सहकारी शिक्षक दर्शन पाटील ,यतीन म्हात्रे, शर्मिला भोईर,अंकुश पाटील सुरेखा खराटे व विद्यार्थी – पालक यांनी मेहनत घेतली.