गटशिक्षणाधिकारी व कर्जत केंद्रप्रमुख यांची किरवली रा. जि.प शाळेस भेट

कर्जत, गणेश पुरवंत

कर्जत किरवली रायगड जिल्हा परिषद कर्जत “मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा” या अभियानांतर्गत प्रा. संतोष जी दौंड सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत म्हसाळा तथा अधिव्याख्याता डायट पनवेल. जि. रायगड व कर्जत केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन पाटील यांनी आज रायगड जिल्हा परिषद शाळेत राबविलेल्या उपक्रमांची व कामकाजाची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद किरवली शाळेला भेट दिली असता.

भेटीदरम्यान साहित्य कला कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जिल्हा तालुका आयोजित राज्यस्तरीय आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल तसेच “देऊया प्रेरणा आणि उपक्रमाची साथ ‘ १००% विद्यार्थ्यांमध्ये करूया FLN चा विकास” या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे सादरीकरण करण्यात आले या उपक्रमाने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ या महाराष्ट्र राज्यातून पाचवा क्रमांक मिळविण्याचा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत भेट दिली असता शाळेमध्ये शंभर टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यात व महाराष्ट्र राज्यात कर्जत तालुक्याचा तिसरा क्रमांक आणण्यात यश मिळाल्याबद्दल रायगड जिल्हा परिषद किरवली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका हरवंदे व शिक्षक वर्ग यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत प्रा. संतोष जी दौंड सर व कर्जत केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन पाटील सत्कार करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page