कर्जत शहरातील शाळेत शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा

कर्जत, गणेश पुरवंत

कर्जत शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या कर्जत व कडाव या इंग्रजी माध्यमांच्या दोन्ही शाळांमध्ये “शिवजयंती उत्सव” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रवीण गांगल, सतीश पिंपरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, पर्यवेक्षक सुनील बोरसे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापिका अश्विनी साळोखे एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या कर्जत व कडाव या इंग्रजी माध्यमांच्या दोन्ही शाळांमध्ये युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त प्री प्रायमरी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली. यावेळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्रतिम अशी पालखी मिरवणूक काढत, महाराजांचे पोवाडे, वीर पराक्रमाचे प्रसंग, गाणी, नृत्य, चित्रकला अशा स्वरूपात अवलौकिक गुणांचे स्मरण व प्रकटीकरण विद्यार्थी वर्गाने केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page