गरज आहे ती महिलांना समाजात व्यक्ती म्हणून समान स्थान देण्याच – निर्मला कुचिक

अलिबाग, अमूलकुमार जैन

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तेजस्विनी पुरस्काराचे शानदार वितरण

महिलांना घरची लक्ष्मी म्हणून तिला घरात बसणे योग्य नाही, तिला लक्षी कमवणारी बनवावा. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले पाहिजे. आपल्या घरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. महिला सर्वच क्षेत्रात चांगले काम करतायत, गरज आहे ती महिलांना समाजात व्यक्ती म्हणून समान स्थान देण्याची, असे मत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पूर्वसंध्येला ( दि. ७ ) अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे आजोजित करण्यात आलेल्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात निर्मला कुचिक प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आदर्श भुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,महिला या कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. फक्त गरज आहे ती महिलांना व्यक्ती म्हणून साथ देण्याची गरज आहे.या वर्षी महिला दिनाची संकल्पना आहे की, महिलांमध्ये गुंतवणूक आणि प्रगतीमध्ये वाढ ही आहे. तिच्यामध्ये लक्ष्मी म्हणून बघू नका तर तिला लक्ष्मी कमविण्यासाठी सक्षम करा. तिला लक्ष्मी कमवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ द्या. लक्ष्मी म्हणून तिची पूजा करू नका. तिला सक्षम करण्यासाठी साहाय्य करा. मंदार वर्तक यानी सांगितले की, आजचे वडील होण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलीला एवढे पाठबळ द्या की ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सक्षम असली पाहिजे. मुलगी ही कुठल्याही क्षेत्रात उ्तुंग भरारी घेण्याची तयारी असली पाहिजे. यावेळी त्यांनी पत्रकारांना आवाहन करताना सांगितले की, ज्या महीलानी विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य केले आहे. असा महिलांच्या यशोगाथा ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून वेळोवेळी मांडत जाव्यात. त्यामुळे त्यांना एक प्रकारची उभारी मिळेल. यावेळी त्यांनी त्यांचे उदाहरण देताना सांगितले की, माझे लग्न झाल्यानंतर पाच वर्षाचा मुलगा असताना माझे एमपीसी मध्ये निवड झाली होती. लग्न झाल्यानंतर मी परीक्षा देण्याची तयारी करत असताना शेजारी माझ्या सासूबाई यांना सांगायचे की, मुलगी ही बांधावरून फिरली तरी घरी बसून खाईल. मात्र माझ्या सासूबाईंनी मला पाठींबा देत सांगितले की माझ्या सासूबाईंनी मला सहकार्य केले नाही माझ्या सुनेला पूर्ण पाठिंबा देऊन. माझी पहिली पोस्टिंग ही गडचीरोली येथे झाली होती. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा देवू शकते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम, जिवाची पर्वा न करता दोन अपहरणकर्त्यांना पकडणाऱ्या पोलीस हवालदार सुवर्णा खाड्ये, प्रतिकूल परिस्थितीवर मात कर एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या सोनाली तेटगुरे तर धनुर्विद्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या तनिषा वर्तक यांना तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . महिला या उत्तम व्यवस्थापक असतात. काहीवेळा आपले कर्तव्य बजावत असतान बरेचदा माहिला आपल स्वत्व हरवून बसतात. तसे नकरता महिलांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करून आपले स्वत्व जपावे, असे मत जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी व्यक्त केले.
महिला सर्वच क्षेत्रात चांगले काम करत आहे. त्यांना समाजाकडून केवळ प्रोत्साहनाची गरज असल्याचे तहसिलदार विक्रम पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्यातील तरुण मुलींनी स्पर्धा परिक्षासाठी तयारी करायला हवी. त्यातून भविष्यात प्रशासकीय अधिकारी महिला जिल्ह्याला मिळू शकतील असे मतं आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page