कर्जत, गणेश पुरवंत

नेरळ, दामत येथून नेरळ पोलीसांना गोवंशिय जनावरांच्या हत्या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असुन, या कारवाईत १५० किलो मांस जप्त करण्यात यश आले आहे. तर दोन आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हा दाखल. यावेळी दोन गोवंशिय प्राण्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईंचे नेरुळकरांनी स्वागत केले आहे.

नेरळ पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नेरळ, दामत येथे प्राणी संरक्षण कायदयाचे सरासपणे उल्लघन करून राज रोशपणे गोवंशिय जनावरांची कत्तल केली जात असल्याची खबर मिळाल्यानुसार, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस साहय्यक निरिक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीसांच्या टिमने दि.०८ मार्च २०२४ रोजी सकाळी ०८.२० सुमारास नेरळ, दामत या ठिकाणी धाड टाकली असता, नेरळ पोलीसांना घटनास्थळी दोन जिवंत गोवंशिय जातीची जनावरे व कत्तल केलेल्या जनावरांचे १५० किलो मांस किंमत ३७.५००/ – रूपये तसेच ओरियंट कंपनीच्या वजन काट्यासह, एक सुरा, लाखडी खांडणी सह काळे मुठ असलेले चाकू असे सापडून आला असुन, या धाडी मध्ये दामत गावातील उसामा वसीम नजे वय वर्ष १४, व अब्दुल उर्फ समी वसीम नजे वय वर्ष १९ यांना अटक करण्यात आली आहे. तर सदर धाडीमध्ये दोन गोवंशिय जनावरांना जिवदान देण्यात नेरळ पोलीसांना यश आले आहे. यावेळी दोन आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२/२०२४ , भा.द.वि.स कलम ४२९, ३४ सह प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब), चे उल्लघन ९ (५) ब व क चे उल्लघन ९(अ) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम १ (ड) (ज) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर नेरळ पोलीसांच्या या कारवाईचे प्राणी प्रेमीं सह नेरळ परिसरातील ग्रामस्थांकडून कौतूक केले जात आहे. तर संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास हा सहाय्यक फौजदार श्रीरंग दत्तात्रय किसवे हे करीत आहे.