उरण, अजय शीवकर

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार निपुण भारत अभियानांतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग उरणच्या वतीने तालुकास्तरीय निपुण महोत्सव 26 मार्च रोजी नगरपालिका शाळा क्रमांक -२ उरण येथे आयोजित केला होता. प्रत्येक केंद्रातून निपुण भारत अंतर्गत भाषा व गणित विषयांचे शैक्षणिक साहित्य ,नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करणे तसेच या शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेसाठी ‘माझी निपुण शाळा ‘व ‘असे आम्ही निपुण झालो ‘हे विषय होते. या निपुण महोत्सवातून निघून भारत अभियानास गती मिळावी हा मुख्य हेतू होता.

यावेळी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती प्रियांका रोहन म्हात्रे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगडचे अधिव्याख्याता श्री रामदासजी टोणे साहेब, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, बी.आर.सी. विषय साधन व्यक्ती, समावेशित विषय साधन व्यक्ती , विषय शिक्षिका व तालुक्यातील सहभागी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमा वेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक- श्री. अजित जोशी ,द्वितीय क्रमांक- दत्तात्रय रामचंद्र पाटील व तृतीय क्रमांक -कौशिक मधुकर ठाकूर दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती व सादरीकरण प्रथम क्रमांक श्री. उमेश पाटील, द्वितीय क्रमांक श्री. सुरेश अर्जुन पाटील व तृतीय क्रमांक अनिल म्हात्रे यांनी पटकावला. निपुण मित्र स्पर्धा अंतर्गत निपुण कृती व सादरीकरण -प्रथम क्रमांक सौ .चैताली म्हात्रे ,द्वितीय क्रमांक -सौ.चैताली राकेश म्हात्रे व तृतीय क्रमांक -श्री .विलास हनुमंत गावंड यांना मिळाला.