पेण, फारुख खान
32 रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमदेवार खा. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी दुपारी ठिक 12.30 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यां वेळेला पेणमध्ये येत असून या अगोदर 2016 च्या पेण नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते. त्यानंतर 2019 ला युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते आणि आता महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याविरूध्द जाहीर सभेमध्ये भाषण करणार आहेत. तर पेणकरांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे की, उपमुख्यमंत्री काय बोलणार धैर्यशील पाटील यांच्या राज्यसभेबद्दल वक्तव्य करणार काय?
यासह अनेक प्रश्र्नांच्या उत्तरासाठी पेणकर या जाहीर सभेला मोठी गर्दी करणार एवढे नक्की. यासभेच्या तयारीसाठी पुर्ण भाजप पेण तालुका व मित्र पक्ष मेहनत घेत आहेत.
सदर बैठकीला दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, श्रीवर्धनचे आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी,पेणचे आमदार रवीशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बादली, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसार माध्यमांना महायुतीचे समन्वयम तथा भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी दिली.