को.ए.सो हायस्कूल केळवणे दहावीचा निकाल १००% लागून यशाची परंपरा कायम

केळवणे, अजय शिवकर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत को. ए.सो. हायस्कूल , केळवणे शाळेचा निकाल १००% लावून यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी पास होउन १६ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य तर ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले.

को.ए. सो. हायस्कूल केळवणेच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री.भीमराज डोळे सर, शाळा समिती अध्यक्ष वि.ना.कोळी,सदस्य प्रकाश शिवकर, डाँ. देवीदास शिवकर, आशीष घरत, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, सदस्य मातापालक संघ, विदयार्थी व पालकवर्ग या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page