उरण, विरेश मोडखरकर
उरण शहरामध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय यशश्री शिंदे हिच्या निर्दयी खू्नानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय करण्याची मागणी होत आहे. मात्र 'हिंदू जनजागरण समिती' ने एक पाऊल पुढे टाकत, उरणमधील युवतींसाठी 'शौर्य प्रशिक्षण वर्ग' सुरु केले आहेत. या वर्गाचा पहिला टप्पा शनिवार दी.३ ऑगस्ट रोजी शहरातील श्री राम मंदिर सभागृहामध्ये पार पडला.
दाऊद बसुद्दीन शेख नामक नराधामाने लग्नाला नकार देत असल्याचा राग मनात ठेवून, यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीचा निर्दयीपणे खून केल्याची घटना उरणमध्ये घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत विविधठिकाणाहून आंदोलणे करत, दाऊद शेख या आरोपीस फाशीची शिक्षेची मागणी केली जात आहे. तर याच सोबत ‘लवजीहाद कायद’ सुद्धा पारीत झाला पाहिजे अशी मागणिसुद्धा जोर धरत आहे. तर या घटनेनंतर महिला असुरक्षित असल्याच्या भावना येथील महिलांनी व्यक्त केल्या. यांनंतर ‘हिंदू जनजागृती समिती’ च्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी. युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण वर्ग’ सुरु केले आहेत. याचा पहिला टप्पा शनिवारी शहरातील श्री राम मंदिर सभागृहामध्ये घेण्यात आला. या शिबिराला तालुक्यातून साठपेक्षा अधिक युवतींनी सहभाग घेतला. यावेळी गोवा येथून शिबिरासाठी मार्गदर्शनासाठी आलेल्या सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केलळशिकर यांनी युवतींना स्वसंरक्षणाची गरज का? आहे याबाबत मार्गदर्शन केलं. तर या शिबिरातून स्वसंरक्षणाचे प्राथमिक धडे देण्यात आले. साप्ताहाच्या प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत हे शिबीर घेण्यात येणार असून, अधिकाधिक युवतींनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन ‘हिंदू जनजागरण समिती’ च्या माध्यमातून करण्यात येत आहे.