उरण, प्रतिनिधी
अँटी करप्शन आणि क्राईम कंट्रोल क्लब च्या ठाणे शाखेचे उद्घाटन आणि नव निर्वाचित अध्यक्ष म्हणून भूपेश पटेल यांची नेमणूक, एक मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे येथे करण्यात आली. ठाणे मखमली तलावा जवळ या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि अध्यक्ष पदाची नेमणूक महाराष्ट्र अध्यक्ष सागर ठाकूर यांनी भूपेन पटेल यांना प्रशस्तीपत्रक आणि ओळखपत्र देवून केले.
क्लबच्या ठाणे येथील नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यालयामधून संघटनात्मक कार्य करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागामध्ये अधिक जोमाने काम करणे शक्य होणार आहे. या कार्याल्याच्या उद्घाटन प्रसंगी अँटी करप्शन आणि क्राईम कंट्रोल क्लब च्या महाराष्ट्र सेक्रेटरी श्रीमती प्रमोदिनी आचरेकर मॅडम उपस्थित होत्या. तसेच उरण तालुका अध्यक्ष विजय रोहिदास भोईर यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले. संस्थेच्या कार्याबद्दल उपस्थितांना सर्व माहिती दिली. आणि वरिष्ठांचा सत्कार केला. यावेळी उरण टीम चे लिलेश्वर ठाकूर, किरण पाटील तसेच नितीन ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय भोईर यांनी येत्या 6 जून 2023 रोजी 350 व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेक कार्यक्रम प्रसंगी रायगड किल्याच्या पायथ्याशी सर्व शिव भक्तांसाठी "पाणपोई" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र अध्यक्ष सागर ठाकूर यांनी आषाढी वारीनिमित्त दिवेघाट - पुणे येथे लाखो वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या माऊली च्या वाटेवर पायी चालत जाणाऱ्या सर्व विठू भक्तांसाठी चहापाणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.