उरण, विरेश मोडखरकर
नवीमुंबईतील पामबीच मार्गवरील बेलापूर, नेरुळ भागातील संरक्षित पाणवठ्यांवर मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी विहार करत आहेत. तर हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमी देखील गर्दी करत आहेत. या परदेशी पक्षांच्या हजेरी पक्षी प्रेमी, पक्षी तज्ञ्, छायाचित्रकार, निसर्ग प्रेमिंसाठी पर्वणी ठरली आहे. तर गजबजलेल्या शहरामध्ये या पक्षाच्या हजेरीमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.

फ्लेमिंगो हा पक्षी मुलाचा ओस्ट्रेलियातील असून, सध्या हा पक्षी नवीमुंबईतील उरण, बेलापूर, नेरुळ, ऐरोली या भागंमध्ये वास्तव्यास आला असल्याचे पहायला मिळत आहे. गुजरात कच्छ येथून हा पक्षी नवीमुंबईतील या भागामध्ये येत असतो. प्राजणनासाठी योग्य हवामान आणि मुबालक, पोषक आहार येथील खाडी लागतच्या भागात मिळत असल्याने हे पक्षी येथे येत असतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून, फ्लेमिंगो याठीकाणी येतं असतात. सध्या नवीमुंबईतील बेलापूर, नेरुळ येथील संरक्षित पाणवठ्यांवर या पक्षाची हजेरी लागल्याचे पहायला मिळत आहे. हजारोच्या संख्येने हे पक्षी येथे हजेरी लावत असून, पक्षी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने दररोज गर्दी करत आहेत. तर पक्षी प्रेमी, पक्षी तज्ञ्, छायाचित्रकार यांच्यासाठी फ्लेमिंगन पक्षाचे आगमन म्हणजे एक परवणीच ठरली आहे. मुंबईचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलाणारी नवीमुंबई सुद्धा आज गजबजलेलं शहर बनलं आहे. यामुळे येथील वाढती वाहने, झापाट्याने उभ्या राहात असलेल्या मोठ मोठ्या इमारती, अनेक विकास कामे, या सर्वातून होणारे प्रदूषण पाहता येथील पाणवठ्यांवर हजारोच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो पक्षी येथील शहराला वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देत आहेत.

फ्लेमिंगो पक्षी एव्हड्या जवळून पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती. मात्र आज हे पक्षी अगदी जवळून पहाता आले. यामुळे या परदेशी पक्षांबाबत, त्यांच्या हालचालींबाबातच्या गोष्टी माहिती करून घेता आल्या. आपल्या व्यस्त जीवनात या आठवणी कायमस्वरूपी आपल्या जवळ रहाव्यात यासाठी मोबाईल कॅमेरामध्ये यातील काही क्षण कैद देखील करून ठेवल्या आहे.
अजित थळी, पर्यटक, विक्रोळी-मुंबई

हजारोच्या संख्येने आलेले हे परदेशी पक्षी पाहून खूप आनंद मिळाला. महत्वाचे म्हणजे आजच्या जीवनात आपला स्थानिक सुगरण पक्षी आपल्याला पहायला मिळत नसताना, अशाप्रकारे हजारोच्या संख्येने फ्लेमिंगोसारखे परदेशी पक्षी पहायला मिळणं आणि ते देखील शहरांमध्ये हे खूप भाग्याची गोष्ट आहे. मात्र पक्षी पाहण्याच्या नादात त्याहीपेक्षा या पक्षांजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात अनेक उत्साही लोकं या पक्षांना त्रास देत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
मार्तंड नाखवा, मच्छिमार नेते, उरण-रायगड