अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील रेवस गावातील पकटीवर बोटीची साखळी दिलेल्या पैसावरून प्रशांत कोळी (राहणार-बोडणी ता.अलिबाग,जिल्हा रायगड ) यास तेजस साईनाथ कोळी,रौनीत साईनाथ कोळी व साईनाथ बाळकृष्ण कोळी (सर्व राहणार-बोडणी ता.अलिबाग,जिल्हा रायगड ) या तिघांनी मारहाण केली असल्याबाबतची तक्रार प्रशांत कोळी यांनी मांडवा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,जखमी प्रशांत कोळी यांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी साईनाथ बाळकृष्ण कोळी यांना बोटीवर वापरण्यात येणारी लोखंडी साखळी दिली होती.मात्र दोन महिने उलटूनसुद्धा साईनाथ बाळकृष्ण कोळी हे साखळीचे पैसे देत नव्हते.प्रशांत कोळी यांनी पंधरा दिवसांपूर्वी साखळीचे पैसे मागितले होते त्यावेळीसुद्धा वाद झाला होता.नंतर तो वाद शांतदेखील झाला होता.प्रशांत कोळी हे त्यांच्या बोटीवर काम करणाऱ्या खलाशना जेवण घेवून रेवस गावातील पकटीवर जात असताना तेजस साईनाथ कोळी व रौनीत साईनाथ कोळी हे दोघे पाठीमागून येऊन रॉडने तसेच हातांबुक्क्याने डोळ्यावर, तोडावर छातीवर,पाठणीवर हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळी केली .त्यांनतर साईनाथ बाळकृष्ण कोळी हे त्याठिकाणी येऊन शिवीगाळ करीत मारहाण केली.यामध्ये प्रशांत कोळी हे जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.146/2023 भा.द.वि.स. कलम 323, 504, 34 नुसार तक्रार दाखल केली असून अधिक तपास सहा. फौज.के.ए.पाटील करीत आहेत