प्रतिनिधी, नांदेड
स्वराज्य संकल्प अभियान निमित्ताने छत्रपती संभाजीराजे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असताना हदगाव तालुक्यातील आंबेगाव येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी टरबूज, हळद व केळीच्या बागेची पाहणी करण्यात आली. यावेळी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारने मदत केली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी संभाजीराजेंकडे केली.
छत्रपती संभाजीराजे यांच्यासमावेत स्वराज्य संघटनेचे माधव देवसरकर पाटील, सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, संपर्कप्रमुख करण गायकर, राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर , रघुनाथ चित्रे पाटील , राहुल शिंदे , संजय पवार व अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.